कॅबीनेट मंत्र्यांना उद्यापर्यंत होईल खातेवाटप - मंत्री सुरेश खाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Suresh Khade

मंत्री सुरेश खाडे सांगली-मिरजला जाताना कऱ्हाडला थांबले असताना पत्रकारांशी बोलत होते.

कॅबीनेट मंत्र्यांना उद्यापर्यंत होईल खातेवाटप - मंत्री सुरेश खाडे

कऱ्हाड - मागील अडीच वर्षात तुमच्याकडे खाते असुनही उपयोग काय झाला असा सवाल खाते वाटपावरुन टिका करणाऱ्या विरोधकांना करुन कॅबीनेट मंत्री सुरेश खाडे यांनी ज्यांच्यावर ठपका नाही अशी लोक आमच्या पक्षाने मंत्रीमंडळात घेतले आहेत. खातेवाटप लांबल्याचे बऱ्यावेळा घडले आहे. आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत खातेवाटप होईल, असे स्पष्ट केले.

मंत्री खाडे सांगली-मिरजला जाताना कऱ्हाडला थांबले असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मला मंत्रीपदाची कल्पनाही नव्हती. मी फोन आल्यानंतर मुंबईला गेलो. त्यामुळे जे खाते मिळेल त्याव्दारे अधिकाधिक जनतेची, विकासाची कामे करण्यावर भर देणार आहे. पक्ष जे काम देईल ते आनंदाने करणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्याने अडीच वर्ष त्रास भोगणाऱ्या जनतेला आनंद झाला आहे. आलेले सरकार हे त्यांना रामराज्य वाटत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही बाकी असून त्यामध्ये बाकीच्यांचाही नक्कीच विचार होणार आहे. मंत्रीमंडळात आरक्षणाच्या धर्तीवर महिलांचाही समावेश करण्यात येणार आहे.

पंकजा मुंडेंना लवकरच मोठी जबाबदारी

पंकजा मुंडेना नवीन मंत्रीमंडळात डावललेल गेले आहे, त्याबद्दल त्यांनी व्टिट करुन नाराजी व्यक्त केली आहे. त्या प्रश्नावर मंत्री खाडे यांनी पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी आहे. त्यांनी चांगले काम सुरु केले आहे. पक्षाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना चांगली जबाबदारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देईल, असे स्पष्ट केले.

Web Title: Cabinet Ministers Will Allocated Posts By Tomorrow Minister Suresh Khade Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..