अकाउंटिंगमधील करिअर संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accounting

अकाउंटिंगमधील करिअर संधी

अकाउंटिंग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी नेहमीच उपलब्ध असतात, कारण लेखापरीक्षण हे प्रत्येक व्यावसायिक संस्थेसाठी आणि उद्योगासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे जगातील एक प्रतिष्ठित व शीर्षस्थ करिअर आहे. प्रत्येक संस्था वा कंपनीला एका अशा व्यक्तीची गरज असते, जी कंपनीच्या आर्थिक नोंदी सांभाळण्याचे व व्यवस्थापित करण्याचे काम करते. या पदाला अकाउंटंट म्हणजे मराठीमध्ये लेखापाल म्हटले जाते. कोणत्याही व्यवसायात लेखापालाची (अकाउंटंट) खूप महत्त्वाची भूमिका असते. पेरोल व्यवस्थापन, लेखापरीक्षण (ऑडिटिंग) आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी संस्थेमध्ये हे एक अतिशय महत्त्वाचे पद असते. संस्थेला यश/अपयशाचे आणि भविष्यातील योजनेचे मूल्यांकन करण्यास सक्षम करण्याचे काम लेखापाल करतात.

अकाउंट क्षेत्रातील विविध संधी

अकाउंटिंगमधील नोकऱ्यांमध्ये प्रवेश स्तरापासून कार्यकारी स्तरांपर्यंत वाढ होऊ शकते. पेरोल, ऑडिटिंग आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी संस्थेचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विविध कंपन्यांमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षणाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने अकाउंटंट्सची मागणी वाढत आहे. पात्र उमेदवारांना सार्वजनिक, खाजगी अथवा ना-नफा उद्योग व कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. आपण लिपिक, पेरोल लिपिक, आणि खाते (अकाउंट्स) लिपीकसारख्या करिअर प्रोफाइलची निवड करू शकता. याशिवाय यातील करिअरसाठी इतर भरपूर पर्यायही उपलब्ध आहेत. अकाउंटन्सी फर्म, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अकाउंटिंग शिकवण्याची म्हणजे प्राध्यापकाची संधी उपलब्ध आहे.

लेखापाल नेमके काय करतात?

 • एखाद्या संस्थेचे/उद्योगाचे/व्यवसायाचे आर्थिक विवरण (फायनान्शियल स्टेटमेंट) तयार करणे

 • संस्थेची/उद्योगाची/व्यवसायाची आर्थिक नोंद (फायनान्शियल रेकॉर्ड) ठेवणे

 • संस्था/उद्योग/व्यवसायाचा सर्व कर भरणा वेळेवर होणे हे सुनिश्चित करणे

 • अशा पद्धतींची शिफारस करणे, ज्याद्वारे खर्च कमी होतो आणि महसूल व नफा वाढतो

 • बॅकअप तयार करून आर्थिक डेटा सुरक्षित ठेवणे

या क्षेत्रातील इतर जॉब प्रोफाइल

 • फायनान्स मॅनेजर

 • फायनान्शियल कंट्रोलर्स

 • फायनान्शियल ॲडव्हायझर्स

 • फायनान्शियल डिरेक्टर्स

 • सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट

 • चीफ फायनान्शियल ऑफिसर

 • चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट

 • कंपनी सेक्रेटरी

या करिअरसाठी आवश्यक कौशल्ये

 • संभाषण कौशल्य

 • विश्लेषणात्मक कौशल्य

 • अकाउंटिंगसाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती

 • गणित विषयात प्रभुत्व

 • अकाउंट प्रक्रियेची चांगली समज

 • संगणकीय वातावरणामध्ये अधिक काळ काम करण्याची क्षमता

Web Title: Career Opportunities Accounting Audit Must Affiliate Promoting Any Program

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top