
एका चारचाकी वाहनाचा म्हसवड परिसरात रात्री अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त वाहनातूनच अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
दहिवडी (जि. सातारा) : गोंदवले खुर्द (ता. माण) येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. संशयितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काल (बुधवारी) रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या भाचीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. वरकुटे (ता. माण) येथील अक्षय यादव, प्रकाश यादव, दैवता यादव, मच्छिंद्र काटकर यांनी आपसात संगनमत करून गोंदवले खुर्द येथील माझ्या राहत्या घरातून कशाची तरी फूस लावून पळवून नेली आहे, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान राडा; नऊ जणांना अटक
एका चारचाकी वाहनाचा म्हसवड परिसरात रात्री अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त वाहनातूनच अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यात आल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी भेट देवून माहिती घेतली. अधिक तपास पोलीस हवालदार एस. एन. केंगले करत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे