आंतरजातीय विवाह करुन युवतीवर अत्याचार, साताऱ्यात चौघांवर गुन्हा

गिरीश चव्हाण
Friday, 30 October 2020

प्रिन्स भगतने युवतीची दिशाभूल करत तीन लाख रुपये शासनाकडून मिळत असल्याने तिच्याशी आंतरजातीय लग्न केले. दारू पाजून तिच्यावर अत्याचार करत प्रिन्स व त्याच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटो काढले.

सातारा : अल्पवयीन युवतीशी आंतरजातीय लग्न करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील केसरकर पेठेत राहणाऱ्या चौघांवर काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रिन्स भगत, विजया भगत, आलिशा भगत, प्रिन्सची मावशी (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. तालीम संघासमोर, केसरकर पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबतची तक्रार 43 वर्षीय महिलेने नोंदविली आहे. यात तिने मुलगी 16 वर्षांची आहे, हे माहीत असतानाही प्रिन्स भगतने तिची दिशाभूल करत तीन लाख रुपये शासनाकडून मिळत असल्याने तिच्याशी आंतरजातीय लग्न केले. यानंतर तिला घरी बोलावून डिसेंबर 2019 ते ता. 17 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत अत्याचार केले. 

लज्जास्पद! माण तालुक्‍यात गर्भवती महिलेला मारहाण, तीन महिलांसह सहा संशयितांवर गुन्हा

दारू पाजून तिच्यावर अत्याचार करत प्रिन्स व त्याच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटो काढले. हे करतानाच त्यांनी मुलीला आईशी न बोलण्याबाबत धमकावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याचा तपास सहायक निरीक्षक ए. के. माने करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Has Been Registered Against Four Persons In Satara