सोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा

गिरीश चव्हाण
Saturday, 31 October 2020

जयदेव भालेराव यांनी 2019 मध्ये भाग्यश्री दिलीप शिवणकर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. यानंतर ते कामानिमित्त पुणे येथे गेले. याठिकाणी पत्नी भाग्यश्री व त्यांच्यात वाद होवू लागले. वादानंतर ते पुन्हा बारामती येथे गेले. याठिकाणी सुध्दा वाद न थांबल्याने पत्नीला त्याचठिकाणी सोडून जयदेव हे सातारा येथे परतले.

सातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ, बारामती) या महिलेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जयदेव राजेंद्र भालेराव (रा. कोनार्क अपार्टमेंट, शाहूपुरी) यांनी नोंदविली आहे. 

जयदेव भालेराव यांनी 2019 मध्ये भाग्यश्री दिलीप शिवणकर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. यानंतर ते कामानिमित्त पुणे येथे गेले. याठिकाणी पत्नी भाग्यश्री व त्यांच्यात वाद होवू लागले. वादानंतर ते पुन्हा बारामती येथे गेले. याठिकाणी सुध्दा वाद न थांबल्याने पत्नीला त्याचठिकाणी सोडून जयदेव हे सातारा येथे परतले. दरम्यान, त्यांच्या नात्यातील महिलांचे फोटो भाग्यश्री यांनी इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. या फोटोखाली काही अश्‍लील मेसेज प्रसारित करण्यात आला होता. 

गुगल पे केअर सेंटरमधून फोन.., साताऱ्यात महिलेची फसवणूक

असाच एक मेसेज दि. 28 ऑक्‍टोबर रोजी रात्री जयदेव यांच्या इन्स्टाग्रामवर आला. तो त्यांच्या मित्राने ओपन केला असता, तशाच पध्दतीचे फोटो, अश्‍लील मेसेज व नात्यातील महिलेचा मोबाईल नंबर त्यात देण्यात आला होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे वैतागलेल्या जयदेव भालेराव यांनी याची तक्रार आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविली. यानुसार भाग्यश्री शिवणकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Has Been Registered Against A Woman From Shahupuri Satara News