येरळा धरण क्षेत्रात पोलिसांची धाड; अवैध वाळू चोरीप्रकरणी 13 जणांवर गुन्हा

Illegal Sand
Illegal Sand esakal
Updated on

वडूज (सातारा) : अंबवडे (ता. खटाव) येथे वाळूउपसा करणाऱ्यांवर छापा टाकून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ७० लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबवडे येथील हद्दीत येरळा धरणाच्या (Yerla Dam) भरावलगतच रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा येथील सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल (Assistant Superintendent of Police Aanchal Dalal) यांनी अचानक धाड टाकली. (Case Of Illegal Sand Theft Has Been Registered Against 13 Person At Satara Police Station)

Summary

अंबवडे येथील हद्दीत येरळा धरणाच्या भरावलगतच रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

येरळा धरणालगत हेमंत गोडसे, सूरज पवार, महेश पवार, जेसीबी (JCB) ऑपरेटर मिथुन राठोड, जेसीबी मालक सुधीर गोडसे, पै. अमोल फडतरे, मंगेश फडतरे व अन्य दोन ते तीन जणांनी गोंदवले येथील धैर्यशील पाटील, पिंपरी येथील सुरेश पाटील व गुरसाळे येथील सौरभ जाधव यांच्या सांगण्यावरून जेसीबी, डंपर व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैध वाळूउपसा सुरू केला होता. पंकज साळुंखे, संग्राम गोडसे, बबन सावकार यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या हालचालींवर लक्ष ठेवून संशयितांस वाळूची चोरटी वाहतूक करण्यास मदत केली.

Illegal Sand
रणजितसिंहांच्या नेतृत्वात शनिवारी चक्काजाम

या करवाईमध्ये सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख (Assistant Inspector of Police Malojirao Deshmukh), भीमराव यादव, हवालदार शांतिलाल ओंबासे यांनी पायी चालत जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत. दरम्यान, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात अनधिकृत वाळू उपशाबाबत धाडसी कारवाई झाल्याने या व्यवसायातील अनेकांचे धाबे दणाणले असून पोलिस यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Case Of Illegal Sand Theft Has Been Registered Against 13 Person At Satara Police Station

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com