Bullock Cart Race
Bullock Cart Raceesakal

बैलगाडी शर्यतप्रकरणी 27 जणांवर गुन्हा; सहा लाखांची चार वाहने जप्त

कोरेगाव (सातारा) : बैलगाडी शर्यतीस (Bullock Cart Race) बंदी असूनही बोरजाईवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी सुमारे २७ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहा लाखांची चार वाहने पोलिसांनी (Koregaon Police Station) जप्त केली आहेत. याप्रकरणी रमेश तुकाराम कदम, प्रकाश दुर्योधन कदम (दोघे रा. चंचळी, ता. कोरेगाव), मुसा अस्लम सय्यद (रा. अपशिंगे, ता. सातारा), बलराम सुदाम चव्हाण (रा. सहकारनगर, संगमनगर, सातारा), सूर्यकांत हणमंत मच्छिंद्र, अविनाश अशोक घाडगे, नाना बाळू माने (तिघेही रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव) यांच्यासह अन्य अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सहा लाखांची चार वाहने (एमएच ११ सीएच ४७०२, एमएच ११ सीएच ६२६७, एमएच ११ सीएच ३३२७, एमएच ११ सीएच ४८४१) जप्त केली आहेत. (Case Registered Against 27 People In Koregaon Police Station In Bullock Cart Race Case bam92)

Summary

बैलगाडी शर्यतीस बंदी असूनही बोरजाईवाडीत बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पोलिस कॉन्स्टेबल किशोर हणमंत भोसले (Police Constable Kishor Bhosale) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) हद्दीतील बुरड माळ नावाच्या शिवारातील डोंगरालगत बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती काल सकाळी दहाच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More), सहायक फौजदार केशव फरांदे, कॉन्स्टेबल किशोर भोसले, प्रमोद जाधव, होमगार्ड केतन शेंडगे यांनी बोरजाईवाडी हद्दीतील बुरड माळ नावाच्या शिवारातील डोंगरालगत जाऊन कारवाई केली.

Case Registered Against 27 People In Koregaon Police Station In Bullock Cart Race Case bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com