esakal | धाेंड्याच्या महिन्यात बारामतीच्या जावयाला घडली सातारा पाेलिस ठाण्याची वारी
sakal

बोलून बातमी शोधा

धाेंड्याच्या महिन्यात बारामतीच्या जावयाला घडली सातारा पाेलिस ठाण्याची वारी

जावयाने चोरलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज नुकताच पाेलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

धाेंड्याच्या महिन्यात बारामतीच्या जावयाला घडली सातारा पाेलिस ठाण्याची वारी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : खेड येथील जयमल्हार हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या हर्षा हरी नाईक यांच्या घरातून सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी लाटे (ता. बारामती) येथील राहुल रमेश खलाटे याने चोरला होता. याप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खलाटेला नुकतीच अटक केली.

हर्षा नाईक या खलाटेच्या सासू आहेत. एक डिसेंबर 2019 रोजी त्यांच्या घरातून खलाटेने रोकड, सोन्याचे दागिने व इतर संसारोपयोगी साहित्य चोरून नेले होते. याची तक्रार तब्बल दहा महिन्यांनी हर्षा हरी नाईक यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नुकतीच नोंदवली हाेती.

बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्येष्ठांचा होतोय कोंडमारा
 
चोरी करणारा खलाटे साताऱ्यातील बॉंबे रेस्टॉरंट चाैकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष पवार, रवींद्र वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, वैभव सावंत, संजय जाधव यांनी खलाटेला अटक केली. खलाटेकडून चोरलेले चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ऐवज नुकताच जप्त करण्यात आला आहे.

'जावली'त निवडणुकीचे वारे; पदांसाठी मातब्बरांनी थोपटले दंड

Edited By : Siddharth Latkar