मुलीच्या विनयभंगप्रकरणी साताऱ्यात एकास अटक

मुलीच्या विनयभंगप्रकरणी साताऱ्यात एकास अटक

सातारा : शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे सीमकार्ड चोरून नेणाऱ्याकडून मोबाईल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. अनिल बाबासाहेब थोरात (वय 33, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. 27 जूनला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने एका घरात बेकायदा प्रवेश करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, तसेच कोणाला माहिती दिलीस तर तुला मारीन, अशी धमकी देत तो पळून गेला.
जिल्हा बॅंकेचे शेतकरी व ग्राहकांसाठी आवाहन 

या वेळी तो तिचे सीमकार्डही घेऊन गेला होता. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा गंभीर असल्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तो तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता.

लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट

शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्याने तपास करत गुन्ह्याचा छडा लावला. त्यामध्ये थोरातला अटक करून चोरीला गेलेले सीमकार्ड त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. अधिक चौकशीत त्याच्याकडून मोबाईल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर तपास करत आहेत. या कारवाईत शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार अतिश घाडगे, सतीश बाबर, सुनील भोसले, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते, चालक नितीन शिंगटे सहभागी झाले होते.

संपादन - संजय शिंदे

मैं कभी हारती नहीं म्हणत विद्या बालनची शकुंतला देवी करतेय प्रेक्षकांवर जादू.. पाहा ट्रेलर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com