जावळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Jawali taluka
Jawali talukaesakal

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आज पीडित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचं आमिष देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर मेढा पोलीस ठाण्यात (Medha police station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Summary

जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.

या प्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुळकर, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर या सहा जणांवर अतिसंवेदनशील गुन्ह्याची तक्रार दाखल नाकारण्यास, तसेच 25 हजाराचे आमिष दाखवून पीडित कुटुंबीयांना धमकावणे, अशा गुन्ह्याखाली या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीस दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65, रा. नेवेकरवाडी ता. जावळी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आणखीन यामध्ये सहा आरोपींचा समावेश झाला आहे.

Jawali taluka
जावळीत 65 वर्षाच्या वृध्दाचा 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीदेखील आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला देखील समज देखील देण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी नराधम आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला व हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत पंचवीस हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला, या प्रकरणी सहा जणांविरोधात मेढा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक 6 गाव पुढाऱ्यांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात हे प्रकरण मिटवण्यासाठी आले होते. ते सर्व राजकीय प्रतिष्ठीत गाव पुढारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पीडिताच्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या या सहा गाव पुढाऱ्यांना मेढा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. 

Jawali taluka
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द

जावळीत सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com