रहिमतपूरच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

इम्रान शेख
Saturday, 28 November 2020

संबंधित व्यापा-याला लुटल्यानंतर त्याने रहिमतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. 

रहिमतपूर (जि.सातारा) : येथील व्यापाऱ्याला चौकीचा आंबावरून परत येत असताना अंभेरी घाटात मारहाण करत लुटणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
रहिमतपूर येथील व्यापारी चौकीचा आंबावरून परत येत असताना ता. 11 रोजी सायंकाळच्या सुमारास अंभेरी घाटात काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांच्याजवळील रोख 19 हजार 250 रुपये व 16 हजार रुपये व मोबाइल असा एकूण 35 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल घेत पोबारा केला होता. याबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शंभरला शंभर पॉइंट: वेबसाईटचा आधार घेत क्रिकेट, पत्त्याचा अंदर बहार
 
तपासांतर्गत रहिमतपूर पोलिसांनी रंजित नाना चव्हाण (रा. पळशी ता. खटाव), विशाल कैलास परोटे (रा. औंध) व अमोल श्रीमंत मोहिते (रा. बेलेवाडी, ता. कोरेगाव) यांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Three In Rahimatpur Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: