पाडळीतील आजींना 'त्यांनी' विचारले बरं हाय का, अन् पळविले लाखांचे दागिने

पाडळीतील आजींना 'त्यांनी' विचारले बरं हाय का, अन् पळविले लाखांचे दागिने
Updated on

कोरेगाव (जि.सातारा) : आधी रस्त्यावर भेटून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर अर्ध्या तासाने दागिन्यांचे डिझाईन बघण्याचा बहाण करून घरी आलेल्या दोघा अज्ञातांनी सातारारोड पाडळी (ता. कोरेगाव) येथील एका महिलेचे सुमारे दहा तोळ्यांचे एक लाख 85 हजारांचे दागिने घेऊन भरदिवसा पोबारा केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
तलाठी भरती निकालाचे घोडे अडले कुठे?
 
यासंदर्भात चतुरा दत्तात्रय फाळके (रा. सातारारोड पाडळी, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की काल खिळा नावाच्या शिवाराकडे पायी निघाले होते. त्या वेळी गोविंद दूध डेअरीसमोरून सव्वादहाच्या सुमारास जात असताना दुचाकीवरून दोघे जण कोरेगावकडे निघाले होते. त्यांनी गाडी थांबवून गाडी चालवणाऱ्याने "आजी बरे आहे का,' असे विचारले. त्यावर "तुम्हाला मी ओळखले नाही, तुम्ही कोण,' असे मी म्हणाल्यावर गाडी चालवणाऱ्याने "मी भूषण साबळे शिवथरचा आहे. मी तुमचे घरी येऊन गेलो आहे,' असे म्हणून मागे बसलेल्या इसमाला म्हणाला "आजीला नमस्कार कर.' त्यानंतर भूषण असे नाव सांगणाऱ्याने "भावाचे लग्न ठरले आहे, आम्हाला सोने करायचे आहे. डिझाईन कसली करावी, बांगड्या, की पाटल्या कराव्यात' असे विचारले. त्यावर त्यांना बांगड्या करण्यास सांगितले.

शाळा बंद; शिक्षकांच्या बदल्यांचा अट्टाहास का? 

दरम्यान, "आम्ही कॅरेट घरी ठेऊन येतो,' असे म्हणून ते निघून गेले आणि मी माझ्या शेतात गेली. त्यानंतर पावणेअकराच्या सुमारास मी शेतात खुरपत असताना ते दोघे पुन्हा दुचाकीवर आमच्या शेतात आले व "आजी तुमच्या बांगड्यांची डिझाईन दाखवा, आम्हाला गंठण देखील करायचे आहे,' असे म्हणाले. त्या वेळी मी माझ्या फोनवरून पतीला फोन लावत होते. त्या वेळी त्यांनी "आम्हाला गडबड आहे. तुम्ही आमच्या गाडीवरून घरी चला,' असे म्हणून मला फोन लावू न देता त्यांच्या दुचाकीवरून आमच्या घरी गेलो. त्यानंतर मी माझ्याकडील सोन्याच्या बांगड्या व गंठण त्यांना दाखवले. त्या वेळी त्यांनी "आम्हाला चहा वगैरे काही नको, रद्दी पेपर द्या,' असे सांगितल्यावर मी पेपर आणण्यासाठी गेले. बाहेर आल्यानंतर ते दोघेही दिसले नाहीत; परंतु त्यांनी आणलेले पपईचे कॅरेट तेथेच होते. त्यानंतर बाहेर येऊन पाहिले असता, ते दिसले नाहीत. त्या दोघांनी माझे 85 हजारांचे 45 ग्रॅमचे सोन्याचे पट्टी मंगळसूत्र, एक लाखाच्या 50 ग्रॅमच्या चार सोन्याच्या बांगड्या, असे एकूण एक लाख 85 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

संपादन : संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com