Mahabaleshwar : महाबळेश्वरातील बस स्थानकात बॉम्ब? अज्ञाताचा पोलिसांना थेट फोन

निनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱ्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mahabaleshwar Bus Stand
Mahabaleshwar Bus Standesakal
Updated on
Summary

निनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱ्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महाबळेश्वर (सातारा) : येथील बस स्थानकातील एक चारचाकी वाहनात बॉम्ब (Bomb) असल्याची माहिती एका अज्ञाताने फोनवरून दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली. काल सायंकाळी व बुधवारी दुपारपर्यंत विविध पथकांकडून बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने शहरवासीयांचा जीव भांड्यात पडला. निनावी फोन करून बॉम्बची माहिती देणाऱ्या विरोधात आज पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही

बस स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन अज्ञाताने काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर तातडीने पोलिसांनी बस स्थानक, आगार परिसरात तपासणी केली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. काल रात्रीपासून बस स्थानकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता; परंतु माहितीची खातरजमा करण्यासाठी आज पुन्हा सातारा येथून दहशतवाद विरोधी पथक, बॉम्बशोधक- नाशक पथक व श्वान पथक अशा विविध पथकांचे अधिकारी बस स्थानक परिसरात दाखल झाले होते.

Mahabaleshwar Bus Stand
माझ्याकडचे अंतर्वस्त्र संपलेत, ते आणायला दिल्लीला गेलो होतो; असं का म्हणाले बसंत सोरेन?

वाहनांसह प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी

या पथकांनी स्थानकातील प्रत्येक चारचाकी वाहनांसह प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी सुरू केली. स्थानकातील बेवारस वाहनांची त्यांनी तपासणी करण्यात आली. बस स्थानकासमोरील टॅक्सीतळ व परिसरात तपासणी केली. पथकाने बाजारपेठेतही फेरफटका मारून बॉम्ब ठेवलेले वाहन शोधण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या या तपासणीमध्ये बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

Mahabaleshwar Bus Stand
Supreme Court : CAA ला आव्हान देणाऱ्या 200 हून अधिक याचिकांवर 12 सप्टेंबरला सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill
Satara Mahimangad Fort conservation project
Rural Youth’s Inspiring Journey: Harsh Indalkar Joins the Indian Air Force
Swimming Trip Ends in Tragedy: Young Boy Dies After Drowning in Karad
Marathi News Esakal
www.esakal.com