'रॉकिंग गर्ल अनू'; इन्स्टाग्रामवर बदनामीप्रकरणी एकावर गुन्हा

'रॉकिंग गर्ल अनू'; इन्स्टाग्रामवर बदनामीप्रकरणी एकावर गुन्हा
Updated on

सातारा : एका अनोळखीने त्याच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत इन्स्टाग्राम या सोशल साइटवर एका मुलीसह एका महिलेचे फोटो त्यांच्या फोटोशेजारी अश्लिल फोटो टाकत बदनामी करण्यासाठी महिलेचा मोबाईल क्रमांक टाकल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, इन्स्टाग्राम, फेसबुकवर महिलांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले असून सर्वांनाच माध्यम वापराचे भान येण्याची गरज निर्माण झालीय. याबाबत मुलीच्या पित्याने तक्रार दिली असून हा प्रकार १४ ऑगस्ट रोजी घडलेला आहे. एका अनोळखी वापरकर्त्याने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर रॉकिंग गर्ल अनू या नावाने फेक अकौंट तयार केले. त्या अकौंटवर धंदेवाली, लव्हर कॉलमी अशा पोस्ट करत मोबाईल क्रमांक टाकला आहे. 

या अश्लिल कॉमेंटबरोबरच वापरकर्त्याने तिथे तक्रारदार यांच्या मुलीचे दोन फोटो टाकले व त्याच्या शेजारी अश्लिल छायाचित्रे प्रसारित केली. तसेच तक्रारदाराच्या वहिनीचा मोबाईल क्रमांक त्या फेक अकौंटवर टाकून त्यांची बदनामी केलेली आहे. याबाबत तक्रारीनंतर पोलिसांनी त्या अनोळख्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार कराळे करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Arrives at Dare Village
Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Marathi News Esakal
www.esakal.com