कांदा निर्यात बंदीचा केंद्राने फेरविचार करावा : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

सचिन शिंदे
Friday, 18 September 2020

राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत, लिलाव थांबले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करणार असल्याची माहिती नुकतीच सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

पाटील म्हणाले, देशातील एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला, तर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीमध्ये सुद्धा जवळपास 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकऱ्यांचा असतो. त्यातच निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होईल. खासदार शरद पवार यांनी सुद्धा नुकतीच केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीसंदर्भात चर्चा केली. 

MarathaReservation : तर मी राजीनामा देईन : उदयनराजे

राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू झाली आहेत, लिलाव थांबले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाला कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती करण्यात येईल.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Central Government Should Reconsider The Ban On Onion Exports Satara News