कोरेगाव : सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कोरेगाव तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देत समाधान व्यक्त करताना काही उपयुक्त सूचनाही केल्या. एकंबे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला..Railway Conducts Test : यंत्रणेच्या सतर्कतेची रेल्वेने घेतली चाचणी.एकंबे शाळेत मराठी, इंग्रजी, गणित अशा विविध विषयांच्या बाबत श्रीमती नागराजन यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही त्यांना निर्भयपणे उत्तरे दिली. विविध विषयांबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसन्नतेचे वातावरण होते. शिक्षकांच्या कामकाजाबाबतही श्रीमती नागराजन यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या एकंदरीत प्रगतीबाबतही त्यांनी कौतुक केले. एकंबे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. चिमणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास त्यांनी भेट दिली. कामकाजाचा आढावा घेऊन समाधानहून व्यक्त केले. पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी द्यावयाच्या गाव भेटीबाबत त्यांनी चर्चा केली. तडवळे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. शंकर गांधीले उपस्थित होते..संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. उपयुक्त सूचना केल्या. दरम्यान, कोरेगावमधील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या बांधकाम ठिकाणाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. बांधकामाबाबत चर्चा केली. सर्व विकासकामांबाबत व शाळेच्या कामकाजाबाबत नागराजन यांनी विशेष समाधान व्यक्त केले..श्रीमती नागराजन यांनी विविध विकासकामांना दिलेल्या भेटीबाबत गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण म्हणाल्या, ‘‘विकासकामांच्या पाहणी करताना नागराजन यांनी समाधान व्यक्त करतानाच उपयुक्त सूचनाही केल्या. एकंबे जिल्हा परिषद शाळा, बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती, कोरेगाव पंचायत समिती इमारतीचे नवीन बांधकाम इत्यादीबाबत समाधान व्यक्त केले. श्रीमती नागराजन यांनी दिलेल्या सूचनांचे आमच्याकडून तंतोतंत पालन केले जाईल.’’.Sugarcane Price Stagnation : ऊसदर कोंडी फोडणार कोण?, शेतकरी हवालदिल.या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपअभियंता रेहाना मुल्ला, पशुधन विकास अधिकारी डॉ. संजयकुमार भिसे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, कार्यकारी अभियंता अमर नलवडे, सहायक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.