

Mahabaleshwar Solar Lights
esakal
भोसे: जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर सातासमुद्रापार यशाचे शिखर गाठल्यानंतरही आपल्या मातीशी असलेली नाळ कशी जपली जाते, याचे उत्तम उदाहरण दाभे मोहन (ता. महाबळेश्वर) गावचे सुपुत्र चंदन चव्हाण यांनी घालून दिले आहे. इटलीस्थित यशस्वी उद्योजक असताना सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील तब्बल ५० गावांना सौर पथदिवे त्यांनी भेट दिले आहेत.