Video : सर्वसामान्यांशी एकरूप होणाऱ्या चंद्रलेखाराजे पंचतत्त्वात विलीन

सिद्धार्थ लाटकर
Monday, 14 September 2020

अदालत वाडा ते माची पेठेपर्यंत पार्थिव पालखीतून नेण्यात आले. तेथून पुढे पालखी वाहनात ठेवण्यात आली.

सातारा : छत्रपतींच्या घराण्यातील असूनही सर्वसामान्यांच्या सुख दु:खांशी कायम एकरुप होणाऱ्या सामान्यांच्या अडीअडचणीला खंबीरपणे उभे राहून सर्वांच्या हदयात आपल्या साध्या राहणीने आणि स्थान मिळविणाऱ्या चंद्रलेखाराजे भोसले यांच्या निधनाने अनेकांना शोक अनावर झाला.

आज (सोमवार) राजघाटावार अंत्यसंस्कारासाठी पार्थिव नेताना अनेकांना अश्रु अनावर झाले. ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भाेसले यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे भोसले यांचे रविवारी (ता.13) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जून्या आणि नव्या पिढीतील महिलांसह नागरिक अदालात राजवाडा येथे अंत्यदर्शनासाठी जमा झाले होते. आरशे महालात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले हाेते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केली भूमिका

आज (सोमवार) सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव अदालत राजवाडा येथून संगम माहूली राजघाटावार नेण्यात आले. फुलांनी सजविलेल्या पालखीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंतयात्रेत ज्येष्ठ नेते त्यांचे पती शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, सत्वशिलाराजे भोसले यांच्यासह राजघराण्यातील कुटुंबातील सदस्य आणि सातारकर नागरिक सहभागी झाली होते.

अध्यादेश काढा; अन्यथा परिणामाला सामोरे जा; उदयनराजेंचा महाविकासला इशारा

अदालत वाडा ते माची पेठेपर्यंत पार्थिव पालखीतून नेण्यात आले. तेथून पुढे पालखी वाहनात ठेवण्यात आली. कृष्णेकाठच्या राजघाटावर त्यांचे नातू कौस्तुभराजे पवार यांनी भडाग्नी दिला. अंत्यविधीस शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागिरक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandralekha Rajebhosale Adalatwada Funeral Satara News