पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बाबर कुटुंबास मदतीचा धनादेश सुपूर्द

उमेश बांबरे
Saturday, 17 October 2020

हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, विशेषत: नदी, ओढयाच्या काठच्या नागरिकांनी पाण्यात उतरु नये अथवा आपली जनावरे पाण्यात घेऊन जावू नयेत. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा : माण तालुक्यातील देवापुर येथील सुनिल सोपान बाबर हे 15 ऑक्टोबर रोजी मुसळधार वृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून मृत झाले.  शासनाच्या नियमानुसार त्यांच्या पत्नी सिंधुबाई सुनील बाबर यांना चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रशासनाकडून देण्यात आला.

हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, विशेषत: नदी, ओढयाच्या काठच्या नागरिकांनी पाण्यात उतरु नये अथवा आपली जनावरे पाण्यात घेऊन जावू नयेत. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A check for help was given by the administration to the Babar family who were swept away in the flood waters at Devapur in Maan taluka