मायभूमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath SHinde

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आगमन झाले.

मायभूमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत

- आशपाक पटेल

शिरवळ - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आगमन झाले. यावेळी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर निरा नदीकाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबेनेट मंत्री शंभुराजे देसाई यांचे शिंदेवाडी (शिरवळ) ता. खंडाळा येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले तर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

यावेळी कोल्हापूर विभागाचे पोलीस महासंचालक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, नितीन भरगुडे पाटील,पुरुषोत्तम जाधव, शिरवळचे सरपंच लक्ष्मीबाई पानसरे, भाजपाचे अनुप सुर्यवंशी,प्रदीप माने , सारिकाताई माने , भुषण शिंदे सह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांना जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच अनेक कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . याचप्रमाणे खंडाळा येथेही कार्यकर्त्यांच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिरवळ व खंडाळा येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.