मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार; दलित महासंघाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dalit Mahasangh

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारच्या कऱ्हाड दौऱ्यात त्यांना घेराव घालण्याचा इशारा दलित महासंघाने दिला आहे.

Dalit Mahasangha : मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार; दलित महासंघाचा इशारा

- सचिन शिंदे

कऱ्हाड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारच्या कऱ्हाड दौऱ्यात त्यांना घेराव घालण्याचा इशारा दलित महासंघाने दिला आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत, या मागणीसाठी महासंघ आक्रमक झाला आहे.

गायरान जमिनीवरील २०२२ पर्यंतची अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी घेराव घालणार असल्याची माहिती दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी दिली. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व अर्थीक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समताचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कऱ्हाड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे ,सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदि परिश्रम घेत आहेत.