esakal | साता-यातील जम्बाे कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar will inaugurate Jamba Kovid Hospital in Satya on Friday..jpg

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे.

साता-यातील जम्बाे कोविड हॉस्पिटलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचे ऑनलाइन उद्‌घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर असणार आहेत.
 
या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खासदार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, मोहनराव कदम, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

या हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्‍सिजन बेड व 52 आयसीयू बेड आहेत. डायलिसिस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत, अशा रुग्णांसाठीही चार बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले