
सातारा : स्त्री- पुरुष समानतेचे नारे सर्वत्र दिले जात असले, तरी स्त्री जन्मा तुझी करुण कहाणी काही केल्या संपत नसल्याची स्थिती आजही आजूबाजूला पाहायला मिळते. मुलीचा जन्म झाल्यास ती ‘नकोशी’ वाटणाऱ्यांची मानसिकता आजही दिसतेच. त्यातूनच स्त्री जातीचे अर्भक सोडून देणाऱ्या घटनांचे भीषण वास्तव समाजासमोर येतेच. यामध्ये जन्म घेणाऱ्याचा दोष काय? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच आजही आई-बाबा नका करू असे; जा मला घेऊन तुमच्यासवे अशी आर्त हाक स्त्री जातीकडून मारली जात असल्याचे हे एक सत्य.