esakal | महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन नको - चित्रा वाघ
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh

वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही. महिला सुरक्षेबाबत अपयशी आहे. लैंगिक अत्याचारातील संशयितांनी अटी- शर्थींवर जामीन मिळत आहे. त्याचीही शहानिशा करण्याची गरज आहे.

महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन नको - चित्रा वाघ

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोना काळातील महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन दिला जाऊ नये, दिलेला जामीन रद्द करावा, यासाठी राज्य शासन व पोलिसांनी न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे केली. त्या नुकत्याच कऱ्हाड दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडी महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही. महिला सुरक्षेबाबत अपयशी आहे. लैंगिक अत्याचारातील संशयितांनी अटी- शर्थींवर जामीन मिळत आहे. त्याचीही शहानिशा करण्याची गरज आहे. छोट्या गोष्टीसाठी व्यक्त होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही. राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत नवा कायदा आणायचा विचार करत आहे. त्याचे प्रारूप काय असणार त्याची स्पष्टता होणे गरजेचे आहे. 

कोरोनाचे कारण देत दिशा कायदा आणत नाही. कोरोना काळात अन्य शासन निर्णय होत आहे. मात्र, महिला सुरक्षेबाबतचा शासन निर्णय का घेत नाही हाच खरा प्रश्न आहे. सरकार कोणाचेही असो महिला सुरक्षेचा प्रश्न सुटला पाहिजे, तो राजकारणाचा विषय होता कामा नये. त्यामुळे जोपर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडत राहतील तोपर्यंत त्या घटना सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

loading image
go to top