फलटण पाेलिसांची रात्रगस्त आता सायकलवरुन

फलटण पाेलिसांची रात्रगस्त आता सायकलवरुन

कोळकी (जि. सातारा) : फलटण शहरामधील काही अरुंद गल्ल्यांमध्ये रात्रीच्यावेळी बिनाआवाज गस्त घालण्यासाठी रेंजर सायकलचा पोलिस ठाण्यामधील कर्मचाऱ्यांना निश्‍चित फायदा होईल, असे प्रतिपादन फलटण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमन यांनी केले. 

फलटण शहर पोलिस ठाण्यास फलटण येथील सिटी बझारचे प्रमुख डॉ. सूर्यकांत दोशी यांनी रेंजर सायकल भेट दिली. त्या कार्यक्रमात श्री. पोमन बोलत होते. पोलिसांना वेळोवेळी रात्रंदिवस काम करावे लागते. त्यांची तब्येत तंदुरुस्त राहावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलिस ठाण्यास रेंजर सायकल भेट देत असल्याचे डॉ. दोशी यांनी सांगितले.

Motivational story : महाविद्यालयीन तरुणांकडून चिमुकल्यांना बाराखडी अन् एबीसीडीचे धडे; घराच्या अंगणात, झाडाखाली भरविली शाळा  

या कार्यक्रमास जयेश दोशी, पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर, हवालदार भैय्या ठाकूर, शरद तांबे, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com