राज्यावर गडद संकट! मानसिक तणावातून आत्महत्या, बाधितांना आधाराची गरज

कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले असून बाधित व त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.
corona
coronaesakal

सातारा : कोरोनामुळे (Coronavirus) समाजमन सैरभैर झाले असून बाधित व त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. त्यातून आत्मघात करून घेण्याच्या प्रकारात वाढ होत असून हे टाळण्यासाठी घाबरू नका... खचू नका... कोरोनाला हरवा... स्वत: हरू नका... असे म्हणत आप्तस्वकीय, मित्र परिवाराने बाधिताला मानसिक आधार देणे आवश्‍यक आहे. (Citizen Participation Is Essential To Win The Fight Against Coronavirus Satara News)

सातारा तालुक्‍यात आठ दिवसांत अशाच पध्दतीने गृह विलगीकरणात असणाऱ्या तीन जणांनी मानसिक तणावातून आत्महत्या करत कोरोनाविरोधातील लढाई अर्ध्यावर सोडली. या घटनांमुळे कोरोनामुळे खचलेल्या कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडली आहे. यापुढील काळात अशा घटना घडू नयेत व कोरोनाविरोधातील लढाई आपल्यातील निकटवर्तीयाने अर्ध्यावर सोडू नये, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्‍यक असून त्यामध्ये आप्तस्वकीय, मित्र परिवाराचा सहभाग महत्त्वाचा आहे.

काय करावे...

  • विलगीकरणातील बाधितांशी सौहार्दपूर्ण वागा

  • त्याला सतत आधारे देत त्याची आस्थेवाईक चौकशी करा

  • सुरक्षित अंतर राखत गृह विलगीकरणातील बाधिताशी मुक्‍तसंवाद साधा

  • तर ठिकाणी विलगीकरणात असणाऱ्याशी व्हिडिओ कॉलिंगवर संपर्कात राहा

  • कोरोना सोडून इतर गोष्टींवर लक्ष देण्यास बाधितास प्रवृत्त करा

  • शक्‍य असल्यास बाधिताबाबत मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा करा

  • सोशल मीडियावरील तर्क आणि तथ्यहिन उपचारपध्दती अवलंबू नका

  • आप्तस्वकीय, मित्र परिवाराने बाधित व त्याच्या कुटुंबांच्या अडचणींकडे लक्ष द्या

काय करू नये...

  • बाधिताला तुच्छतेची, अपराधीपणाची वागणूक देऊ नका

  • कोरोनामुळे बाधिताला दोष देणे टाळा

  • उपचारावरील खर्चाची अनावश्‍यक चर्चा टाळा

  • बाधितासमोर कोरोनामुळे इतर मृत झालेल्यांची चर्चा टाळा

  • जेवण पुरविताना ताट सरकवण्यासारखी कृती टाळा

  • बाधिताला मित्र परिवाराने एकटे पाडू नये, टाकू नये

  • बाधिताच्या आत्मसन्मानाला धक्का पोचेल असे कृत्य टाळा

कोरोनाविरोधात लढताना अनेकांचा धीर, संयम, सहनशीलता संपली आहे. कोरोना कधी संपेल, केव्हा सर्व सुरळीत होईल, या चिंतेने अनेकांना घेरले आहे. बाधा झालेल्यांची उमेद वाढवणे, त्याच्यात आशा वाढेल, असे वर्तन या काळात सर्वांनी करणे आवश्‍यक आहे. बाधिताला अपराधी वाटणार नाही, त्याच्यात न्यूनगंड वाढणार नाही, असे वर्तन सर्वांनी टाळणे आवश्‍यक आहे. संपूर्ण कुटुंबिय पाठीशी असल्याची त्याला खात्री द्या.

-डॉ. राजश्री देशपांडे, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा

Citizen Participation Is Essential To Win The Fight Against Coronavirus Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com