Santosh Deshmukh Murder Case Karad Marchesakal
सातारा
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा'; सरपंच देशमुख हत्याप्रकरणी कऱ्हाडला मोर्चा
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कोणात्याही दबावाला बळी न पडता राज्य सरकारने त्याचा सखोल तपास करावा.
Summary
"संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित वाल्मीक कराड याचे नाव वाल्मीक परळीकर असे घ्या, कऱ्हाड शहराला चांगला वारसा आहे. त्याच्या नावामुळे कऱ्हाड बदनाम होत आहे."
कऱ्हाड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) फाशी झाली पाहिजे, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनमा घ्या.. राजकीय दबावाखाली न पडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंडेचा राजीनामा घ्यावा या आदी मागण्यांसह येथे मोर्चा काढण्यात आला. कऱ्हाड तालुका संघर्ष समितीतसह विविध संघटानांतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात विविध गावचे सरपंच, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.