सुपणेतील शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला; ऊसतोड कामगारांत घबराट

सुपणेतील शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला; ऊसतोड कामगारांत घबराट
Updated on

कराड (जि. सातारा) : पश्चिम सुपणे (ता. कराड ) येथील थोरात मळ्यातील मोहिता शिवारात आज सोमवारी ऊसतोड सुरू असताना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. वन विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.

पश्चिम सुपणे येथील थोरात मळ्यातील मोहिता शिवारात आज अशोक गणपती थोरात यांच्या उसाची तोड सुरू होती. त्या दरम्यान ऊसतोड मजुरांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यामुळे ऊसतोड मजूर घाबरले. त्यांनी तत्काळ याची माहिती ऊस फड मालक थोरात यांना दिली. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या याची माहिती दिली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुपणे भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असून अन्नाच्या शोधार्थ बिबट्या या ठिकाणा आला असावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेली काही दिवासांपासून बिबट्याचा वावर इथे सुरु असून नागरिकांत घबराट पसरली आहे. या भागात वन कर्मचा-यांची संख्या वाढवावी, तसेच बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावावा, अशी मागणीही नागरिक करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com