विनामूल्य कोरोना सेंटर सामान्यांना उपयुक्त ठरेल : विक्रम पावसकर

सचिन शिंदे
Tuesday, 15 September 2020

भाजपच्या सहकार्यातून टिळक हायस्कूलमध्ये सामान्य नागरिकांना 25 बेड उपलब्ध होणार आहेत. सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून विनामोबदला येथे काम चालणार आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. 25 बेडपैकी त्यात सहा ऑक्‍सिजनचे बेड आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : विनामूल्य कोरोना सेंटर नक्कीच सामान्यांना उपयोगी पडेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला. येथील टिळक हायस्कूलमध्ये विक्रम पावसकर मित्र परिवाराने भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यातून विनामूल्य कोरोना केअर सेंटर उभारले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. पावसकर बोलत होते. 

भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे प्रांतीय अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चारेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, श्री. पेंढारकर उपस्थित होते. भाजपच्या सहकार्यातून येथील टिळक हायस्कूलमध्ये सामान्य नागरिकांना 25 बेड उपलब्ध होणार आहेत. सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून विनामोबदला येथे काम चालणार आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. 25 बेडपैकी त्यात सहा ऑक्‍सिजनचे बेड आहेत. 

जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज बंद; सातारा पालिकेचे हे विभाग सुरु!

त्याशिवाय पोलिस, पालिका कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवले आहेत. यावेळी श्री. पावसकर म्हणाले, "जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता त्यामानाने लोकांना बेड व अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत असून, अनेक ठिकाणी त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. परंतु, टिळक हायस्कूलमधील विनामूल्य कोरोना केअर सेंटर जनसामान्यांना नक्कीच आधार देईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Will Benefit From The Corona Center Satara News