
मसूर : यंदा अवकाळी तसेच परतीच्या पावसाने अनेक खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून आहेत; परंतु हवामानात सतत होणारा बदल व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आणखीच संकटात सापडणार आहे.