...तर तुमचे दुकान बंद केले जाईल : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा नवा आदेश

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 17 September 2020

सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आलेली आहे. 

सातारा : देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिका वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोविड-19 चे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सींग व नियमांचे पालन करण्याबाबत विविध प्रकारचे आदेश पारित केलेले आहेत. परंतु अद्यापही सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आलेली आहे. 

त्यामुळे यापुढे सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शहरी अथवा ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटापेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दंड आकारण्यात येणार आहे. ही कारवाई संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (गुरुवार) काढला आहे.

काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम  

दरम्यान वसूल करण्यात आलेला दंड संबंधितांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करावा. पालिका, नगरपंचायत, पालिका कार्यक्षेत्रात (शहरी भाग) तीन हजार रुपये दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. जर एखाद्या शहरी भागातील कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटापेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास आले तर त्यावेळी संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करुन संबंधित दुकान सात दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

माजी नौसेना अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा साताऱ्यात तीव्र निषेध

याबराेबरच ग्रामपंयाचत कार्यक्षेत्रात (ग्रामीण भागात) दाेन हजार रुपये दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. जर एखाद्या ग्रामीण भागातील कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटापेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास आले तर त्यावेळी संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करुन संबंधित दुकान सात दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्याचे आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.

काय आहे पितृ पंधरवड्याचे महत्त्व? श्राद्धपक्ष म्हणजे नेमके काय? घ्या जाणून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Shekhar Singh Issues News Order Satara News Trending News

Tags
टॉपिकस
Topic Tags: