सातारा जिल्हा 'अनलॉक'; सर्व दुकानं वेळेच्या मर्यादेत राहणार सुरु!

Unlock
Unlock esakal

सातारा : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी आज नवी नियमावली जारी केली. त्यानुसार अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने व आस्थापना तसेच खासगी कार्यालये (Private office) सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टारंट यांना ५० टक्के क्षमतेने सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक दुकाने मात्र आठवडाभर वेळेच्या मर्यादेत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. (Collector Shekhar Singh Said Satara Is Unlock And Ordered New Instructions About Coronavirus)

Summary

जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज नवे आदेश लागू केले आहेत.

जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज नवे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व प्रकारची दुकाने वेळेच्या मर्यादेत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभरर सकाळी नऊ ते सायंकाळी चार यावेळेत सुरु ठेवता येतील. औषधे व मेडिकलची (Medical) दुकाने रात्री आठवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार, सातारा जिल्ह्यात आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली असून संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Unlock
नागरिकांनो, सावधान! साताऱ्यात कोरोना पाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस (Coaching classes) पूर्णपणे बंद राहणार आहेत. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणास (Online Teaching) परवानगी असेल. तसेच वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलमधील मेडिकल, औषधांची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी दिली असून घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Collector Shekhar Singh Said Satara Is Unlock And Ordered New Instructions About Coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com