प्रशासकीय मान्यता गतीने पूर्ण करा ; प्रदीप विधाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय मान्यता गतीने पूर्ण करा ; प्रदीप विधाते
प्रशासकीय मान्यता गतीने पूर्ण करा ; प्रदीप विधाते

प्रशासकीय मान्यता गतीने पूर्ण करा ; प्रदीप विधाते

सातारा : चालू आर्थिक वर्षातील सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता गतीने पूर्ण करून १५ मार्चपूर्वी कामे संपविण्यात यावी, तसेच बांधकाम विभागाशी संबंधित कोणत्याही विकासकामांचा निधी शिल्लक ठेऊ नये, असे आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी दोन्ही बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते. दरम्यान, आरोग्य समितीचीही सभा विधाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यात कोरोनाची लाट आटोक्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे मोठे योगदान आहे. ही बाब आरोग्य विभागासाठी अभिमानास्पद असली, तरी आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आणखी काळजी घेणे आवश्यक बनले आहे. जे सातारकर परदेशातून आपल्या मूळ गावी आले आहेत.

हेही वाचा: आता केसपेपरसाठी मिळणार 'युनिकोड' क्रमांक; नागरिकांचा वाचणार वेळ

त्यांची माहिती संकलित करून प्रत्येकाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवून त्याचा अहवाल तत्काळ कसा उपलब्ध होईल, याची खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन प्रदीप विधाते यांनी केले.या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रमोद शिर्के त्याचबरोबर आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व विभागप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत आज झालेल्या आरोग्य समितीच्या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील कोरोना महामारीची सद्यःस्थिती आणि त्यानंतर आलेल्या ओमिक्रॉनची परिस्थिती याचा आढावा घेण्यात आला.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बारकाईने लक्ष ठेवावे. अहवाल त्वरित उपलब्ध होण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी.

- प्रदीप विधाते, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Complete Administrative Approvals Expeditiously Pradip Vidhate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraPradip Vidhate