esakal | 'सरकार चालवण्यासाठी मोदींनी कंपन्या, मालमत्ता, इमारती विकल्या'
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 23 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. त्याविरोधात 'मोदी हटाव-देश बचाव' हा नारा देण्याासाठी सायकल रॅली काढून निषेध नोंदवला आहे.

'सरकार चालवण्यासाठी मोदींनी कंपन्या, मालमत्ता, इमारती विकल्या'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकारची (Central Government) अक्षम्य चूक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकून सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर इंधन दरवाढीचा (Petrol Diesel Price hike) बोजा टाकल्याने सामान्य माणूस मोडला आहे. त्याविरोधात 'मोदी हटाव-देश बचाव' हा नारा देण्यासाठी सायकल रॅली काढून निषेध नोंदवला आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले. (Congress Cycle Rally Against Modi Government At Karad bam92)

शहरातील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कॉंग्रेसच्या सायकल रॅलीस आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, पेट्रोल-डिझेलच्या करवाढीमुळे इंधन दरवाढ झाली आहे. ती करवाढ मागे घेवून इंधनाचे दर कमी करावे, यासाठी आज सायकल रॅली काढून आंदोलन केले. हे प्राथमिक स्तरावरील आंदोलन आहे. त्यातून दरवाढ कमी करण्याची विनंती मोदी सरकारला करणार आहोत.

हेही वाचा: 'मराठा आंदोलकांवर गुन्हे; मग पटोले, चव्हाण, भाई जगतापांवर का नाही?'

Congress Cycle Rally

Congress Cycle Rally

अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकून सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर इंधन दरवाढीचा बोजा टाकल्याने सामान्य माणूस मोडला आहे. १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. २३ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. त्याविरोधात मोदी हटाव-देश बचाव हा नारा देण्याासाठी सायकल रॅली काढून निषेध नोंदवला आहे. भारत ८५ टक्के कच्चेतेल आयात करतो. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यावर कर लावला नव्हता. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले तरी इंधनाचे दर वाढले नव्हते. मात्र, मोदी सरकारचा तोटा कमी करण्यासाठी लोकांवर कर लावून तिजोरी भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याविरोधात आमचे आंदोलन आहे.

Congress Cycle Rally Against Modi Government At Karad bam92

loading image