ॲड. उंडाळकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत ॲड. उंडाळकर व त्यांच्या रयत संघटनेच्या शिलेदारांची थेट भेट झाली.
कऱ्हाड : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत रयत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कॉँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. उंडाळकर यांना ताकद देऊन त्यांचे पालकत्व तुम्ही घ्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली. त्यामुळे उंडाळकरांचा राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा मार्ग खुला होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचेच दिसून आले. अधिवेशनानंतर त्याचा पक्षप्रवेश होईल, अशी चिन्हे आहेत.