esakal | Petrol-Diesel दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; जिल्‍हाधिकार्‍यांना दिल्या शेण्‍या!
sakal

बोलून बातमी शोधा

National Congress Party

जीवनाश्‍‍यक वस्‍तुंसह पेट्रोल, डिझेलच्‍या दरात झालेल्‍या वाढीमुळे सर्वसामान्‍यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

Petrol-Diesel दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जीवनाश्‍‍यक वस्‍तुंसह पेट्रोल, डिझेलच्‍या (Petrol Diesel Price Hike) दरात झालेल्‍या वाढीमुळे सर्वसामान्‍यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या दरवाढीचा तसेच केंद्रशासनाचा निषेध करण्‍यासाठी आज सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीच्‍यावतीने (National Congress Party) जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्‍हाधिकार्‍यांना भेट देण्‍यासाठी शेण्‍या आणल्‍या होत्‍या. आंदोलकांना जिल्‍हाधिकारी कार्यालयात जाण्‍यापासून पोलिसांनी प्रवेशव्‍दारावरच रोखल्‍याने त्‍यांनी बाहेरच घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा (Central Government) निषेध केला. (Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike In Satara)

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सुरेश जाधव (Congress leader Dr. Suresh Jadhav), विराज शिंदे, ॲड. विजयराव कणसे, रजनी पवार, धनश्री महाडिक व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी दिले आहे. यात आंतरराष्‍ट्रीय बाजारात (International market) कच्‍च्‍या तेलाचे दर कमी असतानाही भारतात दररोज पेट्रोल, डिझेल तसेच स्‍वयंपाकाच्‍या गॅसमध्‍ये वाढ करण्‍यात येत आहे. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे सर्वसामान्‍यांचा रोजगार हिरावला गेला असून त्‍यातच दररोजच्‍या दरवाढीमुळे त्‍यांचे जगणे मुश्‍‍कील झाले आहे.

हेही वाचा: बंडातात्‍यांची सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन

Petrol Diesel Price Hike

Petrol Diesel Price Hike

दरवाढ मागे घेवून सर्वसामान्‍यांना दिलासा देण्‍याचे कोणतेही धोरण केंद्र सरकार राबविताना दिसत नसल्‍याने सर्वसामान्‍यांच्‍यात असंतोष आहे. या असंतोषाची दखल घेत केंद्र शासनाने सर्वच वस्‍तुंवरील दरवाढ मागे घेण्‍याची मागणीही निवेदनात करण्‍यात आली आहे. आंदोलनात सहभागी होण्‍यासाठी बहुतांश आंदोलन सायकली घेवून आले होते. सायकली चालवून त्‍यांनी यावेळी केंद्र सरकारच्‍या महागाईच्‍या अनुषंगाने निषेध केला. आंदोलकांनी जिल्‍हादिकार्‍यांना भेट देण्‍यासाठी शेण्‍या आणल्‍या होत्‍या. मात्र, त्‍यांना आतमध्‍ये जाण्‍यापासून पोलिसांनी रोखले. यामुळे आंदोलकांनी प्रवेशव्‍दारावरच घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike In Satara

loading image