
उंडाळे (जि. सातारा) : मातृभाषा संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जयप्रकाश माने यांनी केले. घोगाव येथील श्री बाळसिद्ध विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप समारंभ झाला. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. माने बोलत होते. ओमशिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे संस्थापक संजय भावके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. माने म्हणाले, ""विद्यालयाचे अनोखे उपक्रम ग्रामस्थांना खूप भावतात. शाखाप्रमुख हणमंत सूर्यवंशी हे सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे सर्व विभागांला घवघवीत यश मिळत आहे. शाळा "आयएसओ', तसेच भविष्यकालीन आदर्श देशाची रत्ने घडविणारे दालन करण्याकामी सर्वतोपरी मदत करू.'' श्री. भावके यांनीही शाळेच्या "आयएसओ'साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. संस्था संचालक शंकर पाटील, मानाजी माने, ज्ञानेश भावके, मुख्याध्यापक हणमंत सूर्यवंशी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी नाटिका, एकांकी, एकपात्री प्रयोग, पोवाडा, भक्ती गीते, विनोद, चारोळ्या, कविता, शेरो-शायरी इत्यादी लोककला सादर केल्या. कार्यक्रमाचे नियोजन दिनकर आंबवडे यांनी केले. दोन तास विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. दिनकर आंबवडे यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी मुंढे यांनी आभार मानले. गणेश तपासे, सचिन चव्हाण, रवींद्र पाटील, भीमराव भोसले यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी नियोजन केले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा अजब कारभार; महिलांसह विद्यार्थी त्रस्त
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.