
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढवावे, या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. साताऱ्यातील जातपडताळणी विभाग, समाज कल्याण विभागातील कंत्राटी कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे जातपडताळणीच्या कामावर परिणाम झाला आहे.