
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे असलेल्या कारणात सावकारांची पिळवणूक हा महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. अनेक खासगी सावकार हे मनमानी पद्धतीने व्याज आकारणी करत असल्याच्याही तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याचा विचार करून सहकार विभागाने आता खासगी सावकारांना व्याजाचे दर त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.