
सातारा : विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. सुरुवातीला कोरोना काळात तीन वर्षे निवडणुका पुढे गेल्या होत्या. त्यानंतर काही सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या; पण त्यानंतर पुन्हा या निवडणुकांना स्थगिती मिळाली. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ३१ डिसेंबरपर्यंत निवडणुका स्थगित आहेत.