चिंताजनक! पंधरा दिवसांत 78 गावांना विळखा

Coronavirus
Coronavirusesakal

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे (Corona Patient) प्रमाण पुन्हा वाढू लागल्याने ‘हॉटस्पॉट’ (Hotspot) गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. सातारा, कऱ्हाडसह इतर काही तालुक्‍यांतही कोरोनाचे (Coronavirus) सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’ झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ७८ ‘हॉटस्पॉट’मध्ये तीन हजार ६०० हून अधिक बाधित आढळल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (Corona Infection In 78 Villages In Satara District Satara Marathi News)

Summary

मागील महिनाभरात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली होती.

मागील महिनाभरात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने लॉकडाउनमध्ये (Coronavirus Lockdown) शिथिलता आणली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाउनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात खटाव तालुक्‍यातील कातरखटाव, वडूज, पुसेसावळी, पुसेगाव, मायणी, डिस्कळ, निमसोड, येळीव. जावळी तालुक्‍यातील केळघर, सायगाव, कुडाळ. सातारा तालुक्‍यातील सदरबझार, कण्हेर, कुमठे, चिंचणेर, लिंब, नागठाणे. कोरेगाव तालुक्‍यातील तडवळे, वाठार स्टेशन, रहिमतपूर. वाई तालुक्‍यातील कवठे, माण तालुक्‍यातील म्हसवड, मार्डी, पळशी, मलवडी. खंडाळा तालुक्‍यातील लोणंद, शिरवळ, अहिरे. कऱ्हाड तालुक्‍यातील काले, वडगाव, सदाशिवगड, हेळगाव, कोळे, उब्रंज, इंदोली. पाटण तालुक्‍यातील मोरगिरी, तारळे. फलटण तालुक्‍यातील बरड, तरडगाव, राजाळे, साखरवाडी आदी गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत वडूजमध्ये ८२, खटाव ५०, येळीव ८०, सातारा सदरबझार ९३, नागठाणे ७९, कोरेगाव ६७, रहिमतपूर ६०, लोणंद १२८, शिरवळ ११३, मलकापूर १४८, कार्वे १२० आदी ठिकाणी उच्चांकी बाधित आढळून आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Coronavirus
वारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील ७८ हॉटस्पॉटमध्ये बाधितांची झपाट्याने वाढ झाली आहे. सातारा व कऱ्हाड तालुक्यांत बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनास नागरिकांनी सहकार्य करून नियमांची अंमलबजावणी करावी.

-डॉ. सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी

Coronavirus
पुण्‍यात रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात येते, तर साताऱ्यात का नाही?

एका दिवसात सर्वाधिक लसीकरण

जिल्ह्यात लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात शनिवारी (ता. तीन) २६२ लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत सर्वाधिक ४२ हजार ३१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी ९२, फ्रंटलाईन वर्कर्स २६४ , १८ ते ४४ वयोगटातील २० हजार ६९७, ४५ ते ६० वयोगटातील १२ हजार २६१ नागरिक, ६० वर्षांपुढील नऊ हजार चार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पुढील काळातही जास्तीत-जास्त लशींचे डोस उपलब्ध करून सर्वाधिक लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Corona Infection In 78 Villages In Satara District Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com