सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट आटोक्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आज पहिल्यांदा बाधित रुग्णांची संख्या पाच आढळून आली
Corona Patient
Corona PatientSakal
Updated on

सातारा : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आज पहिल्यांदा बाधित रुग्णांची संख्या पाच आढळून आली आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांचा संक्रमण दर एक टक्‍क्याजवळ आल्याने कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. ऑक्‍टोबर महिन्यानंतर कोरोनाचे मृत्यू व बाधितांची संख्या आटोक्‍यात आली होती. मात्र, जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यानंतर महिनाभरात बाधित व मृत्यूंच्या संख्येने कहर केला. त्यानंतर हळूहळू बाधित रुग्णांची संख्या कमी झाली.

डिसेंबर २०२१ पासून पुन्हा कोरोनाची लाट येण्यास सुरुवात झाली. परंतु, गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही पूर्णपणे आटोक्यात आले आहे. या लाटेत बहुतांशी रुग्ण गृहविलगीकरणातच बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने रुग्णालयांवरील ताण दिसला नाही.

दरम्यान, जानेवारी महिन्यात सुरवातीला संक्रमण दर ३ टक्के होता. त्यानंतर हळूहळू ३० टक्‍क्यांच्या जवळपास पोचला होता. परंतु, सद्य:स्थितीत कोरोना रुग्ण वाढीचा संक्रमण दर जिल्ह्यात आज एक टक्‍क्याजवळ आहे. बाधितांचा संक्रमण दर घटत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ८० हजार १५७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी सहा हजार ६७९ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याचबरोबर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४६६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामधील ५ बाधित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com