esakal | मलकापुरात कोरोनाचा कहर; दहा दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

मलकापूर शहरात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दहा दिवसांत १०४ रुग्णसंख्या वाढली आहे.

मलकापुरात कोरोनाचा कहर; दहा दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (सातारा) : शहरात कोरोना बाधितांच्या (corona patient) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दहा दिवसांत १०४ रुग्णसंख्या वाढली असून, आजपर्यंत शहरामध्ये एकूण २६०४ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे. पालिका व आरोग्य यंत्रणेचे (Malkapur Health Department) युद्धपातळीवर प्रयत्न असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. सोमवारी (ता. १२ जुलैपर्यंत) दहा दिवसांत १०४ रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णवाढीने मलकापुरात अडीच हजारांचा टप्पा पार केला आहे. (Corona Update Large Increase In Corona Patients In Malkapur City bam92)

सध्या शहरात एकूण बाधितांचा आकडा दोन हजार ६०४ पर्यंत पोचला आहे. त्यामध्ये २३९९ रुग्ण बरे झाले आहेत. १३४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यापैकी १०२ होम आयसोलेशनमध्ये, कोविड सेंटरमध्ये (Covid Center) १४, रुग्णालयामध्ये १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ७३ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहिल्या टप्प्यात पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र, २६ जून २० ला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले.

हेही वाचा: 143 किमी सायकलिंग, मिनटात 100 पुशअप्स मारणारी 'सुपरगर्ल'

जानेवारी महिन्यात १५ जण पॉझिटिव्ह आले. फेब्रुवारीमध्ये १९, तर मार्च महिन्यात ७७ रुग्ण वाढले. यापुढे जाऊन सहा मेअखेर एका महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले, तर १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर सरासरी रोज १८ ते २५ दरम्यान रुग्ण बाधित होत आहेत. ही वाढती आकडेवारी चिंताजनक असून, हा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. दिवसेंदिवस आणखी नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरात नव्या रुग्णवाढीचे प्रमाण कमी असले, तरी थांबलेले नाही. सरासरी दिवसाला १५ ते १८ नव्या रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्या कमी करण्याचे आरोग्य विभाग व पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा: तरुणाची किमया! नोकरी सोडून गीर दुधातून मिळवला तब्बल तिप्पट दर

१३४ जणांवर उपचार सुरू

शहरात आतापर्यंत एकूण दोन हजार ६०४ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी दोन हजार ३९९ जणांनी कोरोनावर मात केली, तर ७३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व रुग्णालयांत मिळून उपचारार्थ १३४ रुग्ण आहेत. त्यापैकी १८ रुग्णालयांत, विलगीकरण कक्षात १४, तर १०२ होम आयसोलेटमध्ये उपचार घेत आहेत. यावरून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे धाबेच दणाणले आहेत.

Corona Update Large Increase In Corona Patients In Malkapur City bam92

loading image