esakal | Don't Worry : साताऱ्यात 'कोव्हिशिल्ड'चे 35 हजार डोस उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield vaccine

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत लशींचे वाटप करण्यात आले आहे.

Don't Worry : साताऱ्यात 'कोव्हिशिल्ड'चे 35 हजार डोस उपलब्ध

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात ३५ हजार कोव्‍हिशिल्ड लस (Covishield vaccine) काल (बुधवारी) उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिमेचा (Vaccination campaign) वेग वाढणार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये (Rural Hospital), प्राथमिक आरोग्य केंद्रांत (Primary Health Center) लशींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर सुरवातीला लशींचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात ४० हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. (Corona Vaccination Update 35 Thousand Dose Of Covishield Vaccine Available In Satara District bam92)

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्याला लशींचे अल्प डोस उपलब्ध होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता लशींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मोहिमेला वेग येत आहे. जिल्ह्यात १८ वर्षांपुढील नागरिकांची २१ लाख लोकसंख्या असून, त्यामधील १० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक ५० हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. दरम्यान, आज ३५ हजार कोव्‍हिशिल्डचे डोस उपलब्ध झाले असून, येत्या काही दिवसांत जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: 143 किमी सायकलिंग, मिनटात 100 पुशअप्स मारणारी 'सुपरगर्ल'

गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम गतीने सुरू आहे. पुढील काळातही जिल्ह्यात लशींची पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

-डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

Corona Vaccination Update 35 Thousand Dose Of Covishield Vaccine Available In Satara District bam92

loading image