घाबराचये नाही हे डाॅक्टरांचे वाक्य स्मरणात ठेवले : अलका शिंदे

भद्रेश भाटे
Sunday, 18 October 2020

त्यामुळे 30 सप्टेंबरला माझा वाढदिवस मी दवाखान्यात साजरा केला. खूप छान वाटलं. मनोबल वाढले. घरातील माझे सर्व दीर, जाऊ, मुलगी, जावई आणि दोन नाती तसेच कॉलनीतील सहकारी शेजाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली. खूप बरे वाटले. कॉलनीतील सर्वांचे मनापासून आभार.

वाई (जि. सातारा) : डॉक्‍टरांनी एकच सांगितले की, वहिनी अजिबात घाबराचये नाही आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास, ते आपल्याला पूर्ण बरे करणारच. अशी सकारात्मक मानसिकता, हॉस्पिटलमधील व्यवस्थित उपचारपध्दतीमुळे मी कोरोना विषाणूवर मात केली असे येथील अलका शिंदे यांनी नमूद केले.
 
शिंदे म्हणाल्या, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बालक मंदिराची सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. दोन महिन्यांपूर्वी माझ्या मुलीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेवेळी दवाखान्यात राहण्याचा प्रसंग आला. त्यानंतर मानसिक ताण, दगदगीमुळे मला कोरोगाने ग्रासले. वय 63 वर्षे आहे. परंतु, शुगर, रक्तदाब काहीही नाही. त्रास सुरू झाल्यावर सातारा हॉस्पिटलला तपासणीसाठी गेले. आमच्या सर्वांचे सर्वेसर्वा माझे दीर डॉ. सुरेश शिंदे यांनी सर्व तपासण्या करून घेतल्या. त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु, डॉक्‍टरांनी एकच सांगितले की, वहिनी अजिबात घाबराचये नाही आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास, ते आपल्याला पूर्ण बरे करणारच.

रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

त्रास खूप होत होता. चव लागत नव्हती. जेवण जात नव्हते. अंग दुखत होते. पण, मनाशी एकच निश्‍चय केला होता. घाबरायचे नाही, खंबीरपणे उभे राहायचे. सातारा हॉस्पिटलमध्ये मला छान ट्रिटमेंट मिळाली. डॉ. दीपक, डॉ. निकम, डॉ. जाधव तेथील सर्व स्टाफ कर्मचारी जवळ येऊन न कंटाळता आस्थेने चौकशी करायचे. धीर द्यायचे. हा फार मोठा आधार वाटला. विशेष अभिमानाने सांगेन माझी लेक डॉ. शलाका गौरव शेट्ये ही दिवसांतून चार चार वेळा येऊन माझी चौकशी करत होती. वयाने लहान असून, मला तिचा खूप मोठा आधार वाटत होता. तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती.

उपचारांसाठी "ब्ल्यू बेबी'ने पार केले दोन देशांतील अंतर! जन्मजात हृदयविकार असलेल्या बाळावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

त्यामुळे 30 सप्टेंबरला माझा वाढदिवस मी दवाखान्यात साजरा केला. खूप छान वाटलं. मनोबल वाढले. घरातील माझे सर्व दीर, जाऊ, मुलगी, जावई आणि दोन नाती तसेच कॉलनीतील सहकारी शेजाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली. खूप बरे वाटले. कॉलनीतील सर्वांचे मनापासून आभार. सातारा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा माझ्या दीरांना डॉ. सुरेश शिंदे यांना व त्यांच्या सर्व स्टाफचे, सर्व पेशंटचे मनापासून धन्यवाद. दवाखान्यात काही अडचण आल्यास माझा मुलगा भैय्या हा सदैव सर्वांना मदत करतो. अशा या सर्व कोरोना योध्द्यांना मानाचा मुजरा. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronafighter Alka Shinde Expressed Views After Recovered From Covid 19