CoronaUpdate : सातारा तालुका वगळता बाधितांची संख्या घटली

सिद्धार्थ लाटकर
Monday, 26 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 80 हजार 568 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 45 हजार 373 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 39 हजार 157 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 503 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार 713 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 113 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 13, मंगळावार पेठ 5, शनिवार पेठ 1,  करंजे पेठ 3, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1,  गोडोली 1, पिरवाडी 1,  गोडोली 1, बोरखळ 1, मात्यापूर 1, खेड 2, तामजाईनगर 1, वळसे 1, गुजरवाडी 1, वाघोशी 1, लिंब 3, चिचनेर 1, विकासनगर 1, चिंचणेरवंदन 2.
 
कराड तालुक्यातील कराड 1, उंब्रज 1, मलकापूर 3, तुळसण 1, शेरे 4, वाठार 3, फलटण तालुक्यातील गोळीबार मैदान 2,दलवाडी 3, तरडगांव 1, गिरवी 5, तडवळे 1, ढवळेवाडी 2, वाई तालुक्यातील  सह्याद्रीनगर 1, सुरुर 1, चिंधवली 1, महाबळेश्वर तालुक्यातील  गोडवली 2, खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, पुसेगांव 3, वर्धनगड 5, निढळ 1, गारवडी 1, वर्धनगड 1. माण  तालुक्यातील  दिवड 1, माळवाडी 1, बिदाल 1, कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 1, ल्हासुर्णे 1, रहिमतपूर 1, सोनके 1. जावली तालुक्यातील केडांबे 1, आंबेघर 1, केळघर 1, कुसुंबी 1, मेढा 1, सांगवी 1, आगलावेवाडी 7, इतर  आर्ले 1, खोळेवाडी 1.बाहेरील जिल्ह्यातील  ठाणे 1, शेडगेवाडी(सांगली) 1.

एसटीच्या मालवाहतूकीस साता-यातून तुफान प्रतिसाद

सहा बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये येळगाव ता. कराड येथील 65 वषी्रय महिला. जिल्हा कोविड रुग्णालय सातारा येथे डोकळवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, रहितमपूर ता. कोरेगांव येथील 76 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कुडाळ ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष अशा 6 एकूण   कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

तुमच्या नात्यातही पडलाय का Communication Gap?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaInfected Citizens Increased In Satara Taluka Satara News