esakal | सर्वांत माेठी बातमी : सहकारमंत्र्यांना उद्या मुंबईला हलविणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांत माेठी बातमी : सहकारमंत्र्यांना उद्या मुंबईला हलविणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

सहकारमंत्र्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. ते लवकरच बरे होऊन राज्याचे सहकारमंत्री आणि सातारचे पालकमंत्री म्हणुन पुन्हा कार्यरत होतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वांत माेठी बातमी : सहकारमंत्र्यांना उद्या मुंबईला हलविणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची तब्येत उत्तम आहे. परंतु त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने पुढील उपचारासाठी उद्या (मंगळवार) सकाळी साडेसात पर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डी हाॅस्पिटलला हलवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (साेमवार) येथे दिली.
Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी

सहकारमंत्री पाटील यांना स्वातंत्र्यदिनी कोरोनाची बाधा झाल्याने कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची मंत्री टोपे यांनी आज येथे येऊन विचारपुस केली. त्यानंतर आरोग्यमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पालकमंत्र्यांचे चिरंजीव जशराज पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकारी सिंह, जशराज पाटील व कृष्णाच्या डॉक्टरांशी काहीकाळ चर्चा केली.

कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड 

टाेपे म्हणाले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील माझे सहकारी आहेत. त्यांच्या तब्येतच्या चौकशीसाठी आलो होते. त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांचे चिरंजीव, जिल्हाधिकारी आणि कृष्णा हॉस्पीटलमधील डॉक्टर यांच्याशी चर्चा करुन पुढील उपचारासाठी उद्या (मंगळवार) सकाळी साडेसात पर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्यांची तब्येत चांगली आहे. अधिक जास्त काळजीसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन? 

यावेळी कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष येऊन मी, अतुल बाबा आणि विनायक भोसले यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय व डॉक्टरांशी चर्चा केली आहे. सहकारमंत्र्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. ते लवकरच बरे होऊन राज्याचे सहकारमंत्री आणि सातारचे पालकमंत्री म्हणुन पुन्हा कार्यरत होतील, असा विश्वास सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar