जिल्ह्यातील कोराेनाच्या रुग्ण संख्येत घट; सातारकरांनाे! तुम्हांला काळजी घ्यावीच लागेल

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 17 November 2020

सातारा जिल्ह्यात दाेन लाख 20 हजार 614 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 48 हजार 957 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 44 हजार 743 नागरिकांना उपचारानंतर घरी साेडण्यात आलेले आहे. आजपर्यंत एक हजार 646 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याबराेबरच दाेन हजार पाचशे सहा नागरिक उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 65 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 7, बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1,   लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1, कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1, पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1, फलटण तालुक्यातील साखरवाडी 2, खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1, 
माण  तालुक्यातील राणंद 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1, वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1,  खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4, इतर नंदगाणे 3. 

थंडीची हुडहुडी.. आल्हाददायक वातावरणात चिमुकल्यांनी लुटला पक्षीनिरीक्षणाचा आनंद

तीन बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  दिव्यनगरी ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

विनोबांच्या आचार्य कुलातील सज्जन शक्तीची देशाला गरज 

सातारा जिल्ह्यात दाेन लाख 20 हजार 614 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 48 हजार 957 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 44 हजार 743 नागरिकांना उपचारानंतर घरी साेडण्यात आलेले आहे. आजपर्यंत एक हजार 646 बाधितांचा मृत्यू झाला आहे. याबराेबरच दाेन हजार पाचशे सहा नागरिक उपचार घेताहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Patients Decreased In Satara District