मोफत धान्याचा लाभार्थ्यांकडून काळाबाजार; पाटण तालुक्‍यातील प्रकार

मोफत धान्याचा लाभार्थ्यांकडून काळाबाजार; पाटण तालुक्‍यातील प्रकार
Updated on

मल्हारपेठ (जि. सातारा) : कोरोना काळात केंद्र सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाची काहींच्याकडून बाजारात विक्री होत आहे. 20 रुपये किलोने तांदूळ आणि 15 रुपये किलोने गहू घातला जात आहे. मोफत धान्याचा काळाबाजार लाभार्थ्यांकडूनही सुरू असून, यातील धान्य जनावरांच्या भरड्यात, कोंबड्यांना वापरले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मोफत धान्य पुरवठा योजनेला ग्राहकांनीच वेगळी दिशा दाखवली जात आहे. त्यामुळे मोफत धान्य पुरवठा तातडीने थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपूर्ण भारतात मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे तब्बल तीन महिने कडक लॉकडाउन करण्यात आले होते. किराणा दुकानांखेरीज कोणत्याच सोयी-सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे जगणे अगदी असह्य होऊन गेले होते. यावेळी केंद्र सरकारने भारतातील गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानात माणसी तीन किलो प्रमाणे गहू आणि दोन किलो तांदूळ देण्याची घोषणा केली. याप्रमाणे कडक लॉकडाउनमध्ये मोफत धान्याची जनतेची गरज अगदी महत्त्वपूर्ण ठरली. 

मात्र, जसजसा कोरोना संसर्ग कमी झाल्याने कडक लॉकडाउन हटविल्यामुळे आणि जिल्हाबंदीच काढल्यामुळे बहुतांशी बाजारपेठेत कारखाने, दुकाने, हॉटेल्स, मॉल्स सुरू झाले. मात्र, तब्बल पाच महिने प्रत्येक महिन्याला मिळालेला मोफत गहू, तांदूळ अक्षरशः पाटण तालुक्‍यात घाऊक धान्य व्यापाऱ्यांच्या गोदामात विकला जाऊ लागला आहे. जिल्हा पुरवठा विभागानेही अशा कार्डधारकांची तपासणी करून अशा मोफत धान्यांचा काळाबाजार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अनेक नागरिकांतून होत आहे. पाटण तालुक्‍यातील अंदाजे 150 टन धान्य पुरवठा विभागाला लागत असते, असा अंदाज आहे. 

आम्ही विभागवार समित्यांद्वारे धान्य दुकानदारांकरवी माहिती घेऊन अशा ग्राहकांवर तसेच घाऊक व्यापाऱ्यांवरही कडक कारवाई करणार आहे. आम्ही अशा मोठ्या बाजारपेठांतील घाऊक व्यापाऱ्यांवर लक्ष ठेऊन आहोत.'' 
प्रफुल्ल जाधव, पुरवठा निरीक्षक, पाटण तहसील कार्यालय  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Electric Shock
Sowing Season Worry: ‘Certified’ Seeds Allegedly Fail Quality Test
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Koyna Dam submerged villages history
Marathi News Esakal
www.esakal.com