आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर

आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर
Updated on: 

फलटण (जि. सातारा) : माढा लोकसभा मतदारसंघात पालखी मार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना नगरपंचायत जमिनीला एक दर व त्याच्याजवळ 100 मीटरवर असणाऱ्या जमिनीस जादा मोबदला मिळत आहे. हा भेदभाव कशासाठी, याची चौकशी करावी तसेच महामार्ग निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी लोकसभा अधिवेशनात केली आहे. 

आळंदी-फलटण-पंढरपूर असा 250 किलोमीटरचा विस्तारित पालखी महामार्ग मंजूर झाला असून, यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे प्रक्रियेमध्ये दिला जाणारा जमिनीच्या मोबदल्यामध्ये भेदभाव केला जात आहे. माळशिरस तालुक्‍यात एक गुंठा जमिनीला एक लाख रुपये दर, तर तिथूनच 100 मीटरवर 4 लाख रुपये दर दिला जात आहे. हा भेदभाव मिटवून सर्व शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा, असे स्पष्ट करून महामार्ग निर्मिती प्रक्रियेत सांगोला, माढा, करमाळा येथील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी संसदेत केली. 

माढा मतदारसंघात माळशिरस परिसरातील शेतकरी बांधवांना अधिग्रहण प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नाही. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी खासदार निंबाळकर यांच्याकडे शेतकरी व ग्रामस्थांकडून होत होत्या. त्या संदर्भातच आज लोकसभेत खासदार निंबाळकर यांनी प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar and Supriya Sule Together at Preeti Sangam Their Joint Presence Sparks Political Discussions in Maharashtra
NTCA Committee to Review Sahyadri Tiger Reserve Management and Wildlife Conservation Measures in Maharashtra
Prithviraj Chavan on Satara Politics Admits District Was Neglected During His Tenure as Maharashtra Chief Minister
Karad Agriculture Exhibition